संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 30 June 2022

काश्मीर खोऱ्यात सुरक्षा दलाची कारवाई
लष्करच्या दोघांसह ६ अतिरेक्यांना अटक

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

श्रीनगर – सुरक्षा दलाच्या जवानांनी काश्मीर खोऱ्यात राबवलेल्या मोहिमेत लष्कर-ए-तोयबाचे २ आणि ३ हायब्रीड अतिरेक्यांसह ६ अतिरेक्यांना अटक केली. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि आक्षेपार्ह दस्तऐवज जप्त केला आहे. इरशाद अहमद मीर आणि जाहिद बशीर अशी लष्कर-ए-तोयबाच्या अतिरेक्यांची नावे आहेत. ते पट्टन क्षेत्रातील नेहलपोराचे रहिवासी आहेत.
काश्मीर खोऱ्यात अतिरेकी आणि हायब्रीड अतिरेक्यांच्या वाढलेल्या कारवाया लक्षात घेऊन सुरक्षा दलाने या भागात शोध मोहीम हाती घेतली होती. त्यात लष्कर-ए-तोयबाचे पट्टन क्षेत्रात २ अतिरेकी सापडले. त्यांच्याकडून २ चिनी पिस्तुले, १८ हातबॉम्ब, २ मॅगझिन असा शस्त्रसाठा जप्त केला. बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर येथे पोलिस आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाने लष्कराच्या मदतीने शोध मोहीम राबवली. तेथे हायब्रीड दहशतवादाशी संबंधित ३ अतिरेक्यांना अटक केली. पुलवामा परिसरात राबवलेल्या शोध मोहिमेत आणखी एका अतिरेक्याला अटक केली आहे. हायब्रीड अतिरेकी मजुरांवरील हल्ल्यात सहभागी होते, अशी प्राथमिक माहिती मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami