संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 06 July 2022

किरकोळ नव्हे लक्षणीय शेअर

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

वर्ष 2021 भांडवली बाजारासाठी तेजीचे वर्ष ठरले. या वर्षात सेन्सेक्स व निफ्टीने दुहेरी आकड्यातील रिटर्न गुंतवणूकदारांना दिले. शेअर बाजारात सूचीबद्ध अनेक बड्या कंपन्यांसह मध्यम, लहान आकाराच्या (बाजार भांडवलाबाबत) कंपन्यांबरोबरच अगदीच 10 रुपयेसारखे मूल्य असलेल्या शेअरनेही तेजी या दरम्यान अनुभवली. नवे वर्ष 2022 ची सुरुवात तर अशा कंपन्यांच्या पथ्यावरच पडली. असे अनेक शेअर जे गेल्या काही महिन्यांपासून निस्तेज होते त्यात अचानक मूल्यचमक दिसू लागली. अशा विविध गटातील काही शेअरचा जानेवारी 2022 मधील निवडक प्रवास आपण प्रमुख निर्देशांकांच्या हालचालीसह तारखेनुसार या लेखात पाहूयात –

31 जानेवारी 2022 –
सोमवारी सकाळी बीएसई सेन्सेक्स 650 अंकांनी अर्थात 1.14% ने वधारला आणि 57,850.75 स्तरांवर व्यवहार करत होता. निफ्टी 50 निर्देशांक 1.24% किंवा 17,314.40 अंकांनी वधारुन व्यवहार करत होता. निफ्टी आयटी निर्देशांक 2.81% ने तोडून 34,804 वर पोहोचला. दोन दिवसात आयटी निर्देशांक 4% वाढला. निफ्टी बँकेने 51 अंकांनी उसळी घेतली असून तो 37,748.85 च्या पातळीवर व्यवहार करत आहे आणि निफ्टी मिडकॅप 81 अंकांनी वाढून 7,493.60 च्या पातळीवर पोहोचला आहे. अपर सर्किट लागलेले पेनी स्टॉकची यादी खालीलप्रमाणे आहे.

शेअर सद्य भाव(रु.) मूल्य वाढ (%)
जेपी इन्फ्रा 3.90 4.00
एमपीएस इन्फोटेक्निक्स 1.70 3.03
कन्सोल कन्स्ट्रक्शन 2.90 3.57
गोयंका डायमंड 3.90 4.00

28 जानेवारी 2022 –
आठवडाभर शेअर बाजारात सुरु असलेली घसरण शुक्रवारी थांबल्याने गुंतवणूकदारांचा जीव भांड्यात पडला. या व्यवहारांमुळे सेन्सेक्सने 58,000 अंकांची पातळी ओलांडली आणि नंतर 57,871.99 अंकावर व्यापार केला. निफ्टी 50 ने 17,350 ही पातळी गाठली आणि नंतर 190 अंश किंवा 1.12% ने वधारुन 17,301.45 अंकावर वर व्यापार करत आहे. निफ्टी बँक 166 अंकांनी झेप घेऊन 38,148.35 च्या पातळीवर व्यवहार करत आहे तर निफ्टी मिडकॅप 203 अंकांनी वधारुन 8,552.15 अंकावर व्यवहार करत आहे. अपर सर्किट लागलेले पेनी स्टॉक खालीलप्रमाणे आहेत.

कंपनी सद्य भाव(रु.) मूल्य वाढ(%)
विकास इकोटेक 6.65 4.72
एमपीएस इन्फोटेक्निक्स 1.65 3.13
कन्सोल कन्स्ट्रक्शन 2.80 3.70
अंटार्टिका लि. 3.05 3.39

27 जानेवारी 2022 –
उत्साहवर्धक आर्थिक वातावरण नसल्याने भारतीय शेअर बाजार पुन्हा मंदीवाल्याच्या गर्तेत अडकला आहे. बीएसई सेन्सेक्स 1107 अंकांनी घसरुन 56,751.17 च्या पातळीवर आहे. निफ्टी50 देखील 333 अंकांनी घसरला आणि 16,944.00 च्या पातळीवर आहे. त्याचप्रमाणे निफ्टी बँक 556 अंकांनी घसरून 37,150.15 च्या पातळीवर व्यवहार करत आहे आणि निफ्टी मिडकॅप 155 अंकांनी घसरून 8057.75 च्या पातळीवर गेला आहे. सकाळच्या सत्रात निफ्टी 50 इंडेक्समध्ये सिप्ला, अ‍ॅक्सिस बँक, ओएनजीसी, इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे शेअर्स वधारले. काही पेनी स्टॅक मात्र वाढणारे ठरले.

कंपनी सद्य भाव(रु.) मूल्य वाढ(%)
विकास इको टेक 6.35 4.96
एमपीएस इन्फोटेक्निक्स 1.60 3.23
कन्सोल कन्स्ट्रक्शन 2.70 3.85
अंटार्टिका लि. 2.95 3.51

25 जानेवारी 2022 –
आठवड्याच्या दुसर्‍या दिवशी भांडवल बाजारात घसरण सुरू राहिली. बीएसई सेन्सेक्स 246 अंकांनी घसरला आणि 57,245 च्या पातळीवर व्यवहार सुरु होते. निफ्टी50 देखील 48 अंकांनी घसरून 17,100 वर आहे. निफ्टी बँक 273 अंकांनी वाढला आहे आणि 37,220.75 च्या पातळीवर व्यवहार करत आहे आणि निफ्टी मिडकॅप 63 अंकांनी वधारुन 8,167.95 च्या पातळीवर होता. अपर सर्किटमध्ये असलेल्या काही पेनी स्टॉककडून येणा-या सत्रात गुंतवणूकदारांना लाभ होण्याची शक्यता आहे. मूल्याबाबत काहीसे स्वस्त असे हे शेअर सत्रागणिक वाढीबाबत अव्वल ठरत आहेत.

कंपनी सद्य भाव(रु.) मूल्य वाढ(%)
अ‍ॅन्टार्टिका लि. 2.85 3.64
एसपीएस इन्फोटेक्निक्स 1.55 3.33
कन्सोल कन्स्ट्रक्शन 2.60 4.00
कौशल्या इन्फ्रा 6.05 4.31

24 जानेवारी 2022 –
जागतिक बाजारातील संकेतामुळे भारतीय शेअर बाजार घसरला आहे. बीएसईचा सेन्सेक्स 960 अंकांनी घसरून 58,076 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. निफ्टी50 मध्ये 297 अंकांची घसरण होऊन तो 17,379.20 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. निफ्टी बँक 227 अंकांनी घसरून 37,346.50 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. तर निफ्टी मिडकॅप 238 अंकांनी घसरून 8,198.60 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. खालील काही पेनी शेअर सकाळच्या सत्रात अप्पर सर्किटमध्ये होते. या शेअर्सवर पुढील व्यवहाराकरिता गुंतवणूकदारांनी लक्ष ठेवायला हवे.

शेअर सद्य भाव(रु.) मूल्य वाढ (%)
ऑप्टो सर्किट्स 2.85 3.64
एमपीएस इन्फोटेक्निक्स 1.50 3.45
कौशल्या इन्फ्रा 5.8 4.5
एसकेआयएल इन्फ्रा. 3 3.45

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami