संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 19 January 2022

किरण माने यांना मालिकेतून काढल्यानंतर धनंजय मुंडे यांनी दर्शवला पाठिंबा

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp
Share on telegram
Telegram
Share on email
Email
Share on print
Print

मुंबई – अभिनेते किरण माने यांना स्टार प्रवाहवरील मुलगी झाली हो या मालिकेतून काढून टाकण्यात आले आहे. यामुळे अनेकजण किरण माने यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनीही किरण माने यांची बाजू घेतली आहे.

धनंजय मुंडे सोशल मीडियावरून म्हणाले, “आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करून किरण मानेंसारखा अभिनेता राजकीय विषयावर व्यक्त झाला म्हणून राजकीय दबावाला आणि ट्रोलिंगला बळी पडून स्टार प्रवाहने त्यांना काढून टाकणे म्हणजे सांस्कृतिक दहशतवादाला बळी पडल्याचे लक्षण आहे.” आपण त्यांच्या पाठीमागे असल्याचे मुंडे यांनी यावेळी सांगितलं आहे. अनेक राजकीय नेत्यांनी माने यांना आपला पाठींबा जाहीर केला आहे.

ग्रामीण भाषेतील लहेजा किरण माने यांच्या लेखणीमधून स्पष्टपणे जाणवतो. अनेकदा ते राजकीय भूमिकाही मांडताना दिसतात. मात्र आता याच राजकीय भूमिकांमुळे ते अडचणी साडपले आहेत. त्यांना राजकीय भूमिका घेतल्याने ‘मुलगी झाली हो’ मालिकेमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय.

दरम्यान, किरण माने यांनी गुरुवारी सायंकाळी फेसबुकवर एक पोस्ट केली होती. “काँट लो जुबान, आंसुओं से गाऊंगा. गाड दो बीज हूँ मैं, पेड बन ही जाऊंगा!,” असा मजकूर या पोस्टमध्ये आहे. आपल्याला संपवण्याचा प्रयत्न केला तरी आपण पुन्हा नव्याने उभारी घेऊ असे संकेत किरण मानेंनी आपल्या पोस्टमधून दिलेत. किरण मानेंनी एका दैनिकाशी बोलताना, “होय, मला मालिकेतून काढून टाकले आहे. मला तासाभरापूर्वीच चॅनेलने ही माहिती दिली,” असं म्हटलंय. किरण मानेंनी त्यांच्यावर झालेल्या कारवाईच्या वृत्ताला दुजोरा दिलाय.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami