संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 03 July 2022

किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी शिवसेनेच्या ८ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पुणे – भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर शनिवारी पुणे महानगरपालिकेत हल्ला करण्यात आला होता. शिवसेनेचे पुणे शहराध्यक्ष संजय मोरे आणि त्यांचे काही साथीदार सोमय्या यांना निवेदन देण्यासाठी गेले होते. परंतु त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक आणि शिवसैनिकांत झालेल्या झटापटीत सोमय्या हे तिथल्या पायऱ्यांवर पडले. याप्रकरणी किरीट सोमय्या यांनी दिलेल्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात शिवसेनेचे पुणे शहराध्यक्ष संजय मोरे यांच्यासह आठ जणांविरोधात कलम १४३, १४७, १४९, ३४१, ३३६,३३७ यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची नावे – शहराध्यक्ष संजय मोरे, चंदन साळुंखे, किरण माली, सुरज लोखंडे, आकाश शिंदे, रुपेश पवार, राजेंद्र सहीने आणि सनी गवते अशी आहेत. सोमय्या यांनी यासंदर्भात ट्वीट करून माहिती दिली आहे. तसेच एफआयआरची प्रत पोस्ट केली आहे. आता या सर्वांनी मला मारहाण केली असून त्यांना अटक होणार आहे, असेही सोमय्या यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. सोमय्या हे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जम्बो कोविड सेंटरमध्ये घोटाळा झाल्याची तक्रार दाखल करून पालिका आयुक्तांना भेटण्यासाठी पालिका कार्यालयात जात होते. त्यावेळी काही शिवसैनिकांनी त्यांना निवेदन देण्याचा प्रयत्न करत धक्काबुक्की केली. आता सोमय्या यांनी केलेल्या तक्रारीवरून आठ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे पण त्यांना अटक होते की चौकशी करून सोडून दिले जातेय हे पाहावे लागेल. दरम्यान, संचेती रुग्णालयात जाऊन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी किरीट सोमय्या यांच्या तब्येतीची विचारपूस केली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी सत्ताधीर शिवसेनेवर टीकास्त्र सोडले. किरीट सोमय्यांना ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही लोकशाही आहे की गुंडाराज, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी संताप व्यक्त केला.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami