संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 06 July 2022

किरीट सोमय्या हल्ला प्रकरणी दोन पोलीस कर्मचारी निलंबित

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पुणे – महानगरपालिकेत गेल्या आठवड्यात भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. दिलीप गोरे आणि सतीश शिंदे असे निलंबन झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

भाजप नेते किरीट सोमय्या आज पुन्हा पुणे महानगरपालिकेत आले त्यावेळी त्यांनी पुण्यात दाखल होताच, पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. तसेच पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्यावर देखील सोमय्या यांनी गंभीर आरोप केले. वाधवान प्रकरणातून ते सुटले मात्र आपल्याला जीवे मारण्याच्या प्रयत्नातील आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्यानंतर ते आता सुटणार नाही असे म्हणत सोमय्या यांनी पुणे महानगरपालिकेत एवढे गुंड कसे घुसले, पोलीस आयुक्तांना ते दिसत नाहीत का? त्यांना अटक का झाली नाही? असे सवाल गुप्ता यांना उद्देशून केले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami