मुंबई : शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संघटनेचे नेते संभाजी भिडे पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आलेत. ‘कुंकू लाव, तरच तुझ्याशी बोलेन’ असे वक्तव्य संभाजी भिडे यानी महिला पत्रकाराला उद्देशून केल्यानंतर राज्य महिला आयोगाकडून त्याची दखल घेतली गेली आहे. महिला आयोगाने संभाजी भिडे यांना नोटीस पाठवली असं;ऊन, केलेल्या वक्तव्याबाबत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आदेशच या नोटिसीतून दिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २ नोव्हेंबर रोजी संभाजी भिडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी साम टीव्हीच्या महिला पत्रकार रुपाली बडवे या संभाजी भिडे यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी त्यांना थांबविले असता संभाजी भिडेंनी,‘आमची अशी भावना आहे की ‘प्रत्येक स्त्री ही भारतमातेचे रूप आहे. भारतमाता विधवा नाही. कुंकू लाव मग मी तुझ्याशी बोलतो’ हे वादग्रस्त विधान करत ते तिथून निघाले. मात्र महिला पत्रकराचा अपमान केल्याने अनेक स्तरातून यावर विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या.
यावर आता राज्य महिला आयोगाने जी नोटीस संभाजी भेंडेंना पाठवली आहे त्यात असे म्हटले आहे की, त्यांनी तातडीने भूमिका स्पष्ट करावी असे महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी या नोटिसीतुन म्हटले आहे. मंत्रालयात हा जो काही प्रकार घडला, की, ‘कुंकू लाव तरच मी तुझ्याशी बोलेन’, अशा आशयाचे वक्तव्य संभाजी भिडे यांनी एका महिला पत्रकाराला उद्देशून केले आहे. या वक्तव्यांनंतर समाजाच्या वेगवेगळ्या स्तरातून या विषयीच्या प्रतिक्रिया उमटल्या असताना, आता त्याच पार्शवभूमीवर राज्य महिला आयॊगाने या सगळ्या प्रकारची गंभीर दाखल घेतली असून, संभाजी भिडेंना एक नोटीस पाठवली आहे आणि तातडीने यावर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, की असे वक्तव्य करून नेमके त्यांना काय म्हणायचे हे त्यांनी स्पष्ट करावे, असे म्हटले आहे. सोबतच अशा प्रकारचे वक्तव्य हे महिलांना तुच्छ लेखण्याजोगे आहे. महिलांप्रती त्यांना अपमानास्पद वागणूक देणार आहे असे म्हणण्यात आले आहे. त्यामुळे असे वक्तव्य करण्यामागचा त्यांचा नेमका काय उद्देश आहे, काय भूमिका आहे हे त्यांनी तातडीने स्पष्ट करण्यात यावे असे राज्य महिला आयोगाने आपल्या नोटिसीत म्हटले आहे. यात त्यांना तातडीने उत्तर द्यायला सांगितले आहे. पण संभाजी भिडे यावर आपली काय प्रतिक्रिया नोंदवतायत आणि राज्य महिला आयोगाला आपले काय उत्तर कळवणार याकडे आता सगळ्यांचे लक्ष आहे.