मुंबई- गुजरातमधील श्री स्वामी नारायण मंदिर कुंडलधाम येथे 18 डिसेेंबर 2021 रोजी ‘कुंडलधाममध्ये स्वामीनारायणाचे अक्षरधाम’ या कार्यक्रमांतर्गत श्री स्वामीनारायण यांच्या 7090 विविध रुपांचे अद्भूत दर्शन घडले. विशेष म्हणजे मूर्तींच्या या विशाल समागमला विश्वविक्रम म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळाले आहे. या संदर्भातील प्रेरणास्थान पूज्य श्री ज्ञानजीवनदासजी स्वामी यांच्या प्रातिनिधिक संतांना हा पुरस्कार 29 जानेवारी 2022 रोजी मुंबईत प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिध्द बासरीवादक पंडित रोणू मजुमदार आणि उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी उपस्थित होते. पंडित रोणू मजुमदार आणि खा. गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते ज्ञानजीवनदास स्वामींच्या संतांना गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमावेळी अनेक भाविक आणि मुंबईतील मान्यवरांची उपस्थिती होती. या विश्वविक्रम कार्यक्रमाद्वारे स्वामीनारायण संप्रदायने सनातन हिंदू परंपरा आणि भारतीय संस्कृतीचा सुगंध संपूर्ण जगापर्यंत पोहोचविण्याचे हे कार्य उभे केले आहे. यावेळी बासरीवादक पंडित रोणू मजुमदार आणि उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी आपल्या निवेदनात स्वामीनारायण संप्रदायाच्या परमार्थिक व संस्कार सिंचनच्या कार्याचे कौतुक करत आभार मानले.