संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 31 March 2023

कुख्यात डॉन दाऊदला घेरण्यासाठी एनआयएचे पथक दुबईत दाखल

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

दुबई – मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी दाऊद इब्राहिम हा गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तानमध्ये लपून आहे.पाकिस्तानातूनच दाऊद भारतविरोधी कारवाया करत असून दहशतवाद आणि ड्रग्जला चालना देत आहे.त्यामुळे आता दाऊद आणि त्याच्या टोळी विरोधात परदेशात कारवाई करण्याच्या हेतूने एनआयए अर्थात केंद्रीय तपास यंत्रणा राष्ट्रीय तपास संस्थेचे एक पथक दुबईत दाखल झाले आहे.

केंद्रातील मोदी सरकारने दाऊदच्या मुसक्या आवळण्यासाठी खास प्लॅन तयार केला असून या पार्श्वभूमीवर एनआयएने पाच सदस्यांच्या तपास पथकाला दुबईत पाठवले आहे. हे पथक दुबईतील स्थानिक प्रशासनाला डी गँगबद्दल सविस्तर माहिती देणार आहे.तसेच दुबईत राहून भारतविरोधी कारवाया करणाऱ्या दहशतवादी आणि गँगस्टर्सविरोधात कारवाईची मागणी करणार आहे.एनआयए मुख्यालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, दुबईत गेलेल्या अधिकाऱ्यांची नावे उघड करता येत नाहीत.दाऊद कंपनीविरोधात दाखल गुन्ह्याचा तपास केल्यानंतर आम्ही बरीच माहिती आणि पुरावे गोळा केले आहेत. आम्ही अनेक आरोपींचे जबाब नोंदवले आहेत. तसेच याप्रकरणी अनेक आरोपींना अटकही करण्यात आली आहे.मात्र पुढील तपासासाठी परदेशातील तपास यंत्रणांची मदत लागू शकते.त्याच्या आधारे पुढील कारवाई केली जाऊ शकते.

गेल्यावर्षी एनआयएने दाऊद इब्राहिमसह अन्य आरोपींविरोधात यूएपीए कायद्यांतर्गंत गुन्हे दाखल केले होते.एनआयएचे पथक दाऊद इब्राहिमसह त्याच्या डी कंपनीविरोधात तपास करत आहे.तसेच याच्याशी संबंधित आरोपींविरोधात येणाऱ्या काळात मोठी कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.सीबीआयकडे याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.या प्रकरणात मुंबईसह अनेक ठिकाणांहून आरोपींना अटक करण्यात आली असून बेकायदेशीर संपत्ती जप्त करण्यात आली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या