संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 31 March 2023

कुनोमध्ये चित्त्यांची संख्या वाढणार
आज आफ्रिकेतून नवे १२ चित्ते येणार !

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली- मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये चित्त्यांची संख्या वाढणार आहे. उद्या म्हणजेच शनिवारी १८ फेब्रुवारी रोजी दक्षिण आफ्रिकेतून आणखी १२ चित्ते भारतात दाखल होणार आहेत.भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील करारांतर्गत एका दशकासाठी भारताला दरवर्षी १० ते १२ चित्ते दिले जातील, असे सांगण्यात आले आहे.ही संपूर्ण प्रक्रिया प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत केली जात आहे.
या १२ नवीन चित्त्यांच्या आगमनाने एकूण संख्या २० वर पोहोचणार असल्याची माहिती पर्यावरण मंत्रालयाने काल गुरुवारी दिली.भारतीय हवाई दलाचे – सी १७ ‘ग्लोब मास्टर’ हे विमान गुरुवारी सकाळी ६ वाजता हिंडन विमानतळावरून रवाना झाले आहेत. गुरुवारी संध्याकाळी विमान जोहान्सबर्गला पोहचले आहे. यानंतर ते शुक्रवारी संध्याकाळी भारताकडे रवाना होऊन उद्या भारतात पोहचतील.
दरम्यान, कुनो पार्कमध्ये आधीच ८ नामिबियाचे चित्ते आहेत.नवीन सदस्यांच्या समावेशासह,कुटुंब २० पर्यंत वाढेल.उद्या शनिवारी क्वाझुलु फिंडा गेम रिझर्व्हमधून २ नर आणि एक मादी चित्ता, तर लिम्पोपो प्रांतातील रुईबर्ग गेम रिझर्व्हमधून ५ नर आणि ४ मादी चित्ता भारतात येत आहेत. महासंचालक (वन्यजीव) एसपी यादव म्हणाले की, ‘ते क्वारंटाईनमध्ये होते आणि आता ते आणण्यास तयार आहेत. दक्षिण आफ्रिकेतील अनेक चित्ता तज्ज्ञ आणि पशुवैद्यकीय डॉक्टरही त्यांच्यासोबत येत आहेत. २० फेब्रुवारी रोजी आम्ही चित्ता संवर्धन निधी आणि आंतरराष्ट्रीय चित्ता तज्ज्ञांसह कुनो येथे एक व्यावसायिक परिषद देखील आयोजित करणार आहोत.’

आजचे हवामान
ताज्या बातम्या