टोरंटो – कॅनडाची राजधानी टोरंटोमध्ये महात्मा गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. ही संतापजनक घटना रिचमंड हिल येथील एका हिंदू मंदिरात घडली. येथे महात्मा गांधीजींचा मोठा पुतळा आहे. तो दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास काही लोकांनी पाडला. या प्रकरणाची दखल तेथील पोलिसांनी घेतली असून तक्रार दाखल करण्यात आली आहे.
टोरंटो येथील भारतीय दूतावासाने या घटनेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. दूतावासाने ट्विट करून म्हटले, ‘रिचमंड हिल येथील विष्णू मंदिरातील महात्मा गांधीजींच्या पुतळा पाडल्यामुळे आम्हाला दुःख झाले आहे. तोडफोडीच्या या गुन्हेगारी कृत्याने कॅनडामधील भारतीय समुदायाच्या भावना दुखावल्या आहेत. या घृणास्पद घटनेची चौकशी व्हावी यासाठी आम्ही कॅनडातील अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत’, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
दरम्यान, गांधीजींच्या पुतळ्यावर आक्षेपार्ह शब्द लिहिण्यात आल्याचेही सांगण्यात आले. यॉर्क रीजनल पोलीस कॉन्स्टेबल एमी बौद्रेउ यांनी सांगितले की, पुतळ्यावर ग्राफिक शब्दांमधून ‘बलात्कारी’ आणि ‘खालिस्तान’ असे लिहण्यात आले होते. तसेच ‘यॉर्क रीजनल पोलीस अशा प्रकारचे घृणास्पद गुन्हे सहन करून घेणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.