मुंबई:- ८० आणि ९० चे दशक गाजवणारा ‘कॅम्पा कोला’ पुन्हा एकदा बाजारात दिसणार आहे. रिलायन्स उद्योग समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी प्योर ड्रिंक समूहासोबत २२ कोटींचा करार करून कॅम्पा कोला ब्रँड खरेदी केला आहे. रिलायन्स हे पेय दिवाळीला लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.
रिलायन्सची थेट स्पर्धा कोका-कोला आणि पेप्सिको या कंपनीशी असणार आहे. रिलायन्स कॅम्पा कोला लेमन, ऑरेंज आणि कोला या तीन फ्लेवर्समध्ये लॉंच करण्याच्या तयारीत आहे. पहिल्या टप्प्यात, रिलायन्स त्याच्या रिटेल स्टोअर्स, जिओमार्ट आणि किराणा स्टोअरमध्ये त्याची विक्री करेल. ‘कॅम्पा ब्रँड’ आणि ‘कॅम्पा कोला’ हे 1970 आणि 1980 च्या दशकात दोन लोकप्रिय शीतपेय ब्रँड होते. उदारीकरणानंतर 1990 च्या दशकात ‘कोका-कोला’ आणि ‘पेप्सिको’च्या प्रवेशानंतर या ब्रँडची लोकप्रियता कमी झाली होती.