दिल्ली – पश्चिम बंगाल मध्ये कॅशकांड प्रकरणात सापडलेल्या झारखंडच्या तिन्ही आमदारांची आज काँग्रेस मधून हकालपट्टी करण्यात आली आहे.मात्र हे भाजपचे षढयंत्र आहे असा आरोप काँग्रेसने केला आहे.
पश्चिम बंगाल पोलिसांनी हावडा येथील पंचला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राणीहट्टी भागात नाकाबंदी केली होती. याच नाकाबंदी मध्ये एका संशयित सुव कारची तपासणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणावर नोटा सापडल्या होत्या. या नोटा मोजण्यासाठी पोलिसांना मशीन आणावी लागली . त्यानंतर हि कार जप्त करण्यात आली. दरम्यान चौकशीत या संपूर्ण कॅशकांडचा पर्दाफाश झाला आणि हि कार व पैसे झारखंडमधील ३ आमदारांचे असल्याचे उघडकीस आले. या घटनेमुळे काँग्रेस मध्ये मोठी खळबळ माजली .
त्यानंतर काँग्रेसने या चषकाण्ड मध्ये अडकलेल्या राजेश कच्छप ,नमन कोंगारी , आणि इरफान अन्सारी या तीन आमदारांना आज पक्षातून निलंबित केले. झारखंड काँग्रेसचे मीडिया प्रभारी अविनाश पांडे यांनी हि माहिती दिली . तसेच या प्रकरणाची सध्या चौकशी सुरु आहे. मात्र हे भाजपचे षढयंत्र आहे . कारण विरोधी पक्षाच्या लोकांना बदनाम करण्याची भाजपने मोहीम चालवली आहे असा आरोप पांडे यांनी केला आहे.पश्चिम बंगाल मध्ये अभिनेत्री अर्पिता हिच्या घरात सापडलेल्या खजिन्या नंतर पोलीस ठिकठिकाणी छापेमारी करीत आहेत. नाकाबंदी करून गाड्यांची तपासणी करीत आहेत अशाच एका नाकाबंदीत नोटांनी भरलेली आमदारांची हि गाडी सापडली .