संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 03 December 2022

केंद्राकडून रब्बी हंगामातील ६ पिकांच्या हमी दरात वाढ

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

दिल्ली – दिवाळीच्या तोंडावर केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी आणखी एक दिलासादायक निर्णय घेतला आहे. यंदा रब्बी हंगामातील ६ पिकांच्या एमएसपी मध्ये केंद्राने वाढ केली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

दोन दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी सन्मान योजने अंतर्गत १६ हजारकोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले होते . त्यानंतर आता रब्बी हंगामातील गहू,मसूर,जव ,चणे,राई आणि सूर्यफूल आदी सहा पिकांच्या आधारभूत किमतीत वाढ केली आहे. त्यानुसार चण्याच्या आधारभूत किमतीत १०५ रुपये , मसूरच्या दारात प्रति क्विंटल ५०० रुपये, गव्हाच्या किमतीत ११०रुपये , तर जवाच्या आधारभूत किमतीत १०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. शिवाय राईच्या दरात प्रति क्विंटल ४०० रुपये आणि सूर्यफुलाच्या किमतीत प्रति क्विंटल २०९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णया नंतर शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी हि दुसरी दिवाळी भेट आहे. देशभर सुरु असलेल्या अतिवृष्टीच्या एकीकडे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झालेले असताना, केंद्र सरकार कडून मिळालेल्या या मदतीमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami