संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

केंद्राचा “सर्जिकल स्ट्राईक’ १० युट्युब चॅनल्सवर बंदी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली- बोगस बातम्या देऊन देशात धार्मिक तेढ आणि वैमनस्य निर्माण करणाऱ्या १० युट्युब चॅनल आणि ४५ व्हिडिओवर सरकारने बंदी घातली आहे, अशी माहिती केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली. गुप्तचर संस्थांनी दिलेल्या माहितीवरून ही कारवाई केली, असे त्यांनी सांगितले.

धार्मिक समुदायांमध्ये द्वेष पसरवण्याच्या हेतूने बनावट बातम्या, मॉर्फ केलेले व्हिडिओ आणि आक्षेपार्ह मजकूर काही युट्युब चॅनेल आणि व्हिडिओतून प्रसारित केले जात होते. बंदी घातलेले व्हिडिओही प्रसारित केले जात होते. ते १ कोटी ३० लाख वेळा दाखवले गेले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर १० युट्युब चॅनेल आणि ४५ व्हिडिओंवर बंदी घालून ते ब्लॉक केले आहेत, अशी माहिती ठाकूर यांनी दिली. व्हिडिओत छेडछाड करून खोट्या बातम्या देण्याचे काम हे युट्युब करत होते. अग्निपथ योजना, भारतीय सशस्त्र दल, भारताचे राष्ट्रीय सुरक्षा तंत्र आणि काश्मीरशी संबंधित मुद्दे चुकीच्या पद्धतीने प्रसारित केले जात होते. त्यामुळे सामाजिक सलोखा आणि शांतता भंग होऊन दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होत होती. याची माहिती गुप्तचर विभागाने दिल्यानंतर प्रसारण मंत्रालयाने १० युट्युब चॅनेल आणि ४५ व्हिडिओंवर बंदी घातली. सामाजिक शांतता बिघडवण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी यापूर्वीही १०२ युट्युब चॅनल आणि काही फेसबुक अकाउंटवर बंदी घातली होती, अशी माहिती त्यांनी दिली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami