संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 30 January 2023

केंद्राची आर्थिक तूट ६.२० लाख कोटींवर

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – २०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत केंद्र सरकारच्या महसूली उत्पन्नात ९.५ टक्के वाढ झाली. मात्र खर्चातही वाढ झाल्यामुळे वित्तीय तूट ६.२० लाख कोटींवर गेली. ही वित्तीय तूट एकूण आर्थिक वर्षाच्या ३७.३ टक्के आहे, असे ‘कॅग’ने अहवालात म्हटले आहे.
चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते सप्टेंबर या काळात केंद्र सरकारला १२.०४ लाख कोटी महसुली उत्पन्न मिळाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत ते ९.५ टक्के जास्त आहे. तथापि सरकारच्या खर्चात १२ टक्क्यांची वाढ झाली. हा खर्च १८.२४ लाख कोटींवर पोहोचला. त्यामुळे जादा महसुली उत्पन्नानंतरही वित्तीय तूट वाढली. ती ६.२० लाख कोटींवर गेली. गेल्यावर्षी या कालावधीत वित्तीय तूट ५.२७ लाख कोटी होती. सरकारला या आर्थिक वर्षात वित्तीय तूट १६.६१ लाख कोटी अपेक्षित आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami