संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 03 July 2022

केंद्राचे कामगारविरोधी धोरण! बँक कर्मचाऱ्यांचा २३, २४ फेब्रुवारीला संप

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – केंद्र सरकार कामगार आणि जनविरोधी धोरणे राबवत आहे, असा आरोप करून त्याच्याविरोधात बँक कर्मचाऱ्यांनी २३ आणि २४ फेब्रुवारी २०२२ रोजी देशव्यापी संप पुकारला आहे. त्यात सर्व संघटना सहभागी होणार असल्यामुळे बँकांचे कामकाज ठप्प होईल, असा दावा सेंट्रल ट्रेड युनियनने केला आहे. या संपासह आलेल्या सुट्ट्यांमुळे उरलेल्या फेब्रुवारीत एकंदर ११ दिवस बँका बंद राहणार आहेत.

भारतीय रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या सुट्ट्यांच्या पत्रकानुसार फेब्रुवारीत बँकांना ९ दिवस सुट्टी आहे. त्यात बँक कर्मचाऱ्यांच्या २ दिवसांच्या संपाची भर पडली. सरकारच्या कामगारविरोधी धोरणाच्या विरोधात येत्या २३ आणि २४ फेब्रुवारीला बँक कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे. त्यात देशभरातील बँक कर्मचारी सहभागी होणार आहेत. अखिल भारतीय बँक कर्मचारी संघानेही या संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी बँकेचे व्यवहार ठप्प होतील, असा दावा त्यांनी केला आहे. बँकांना असलेल्या सुट्ट्यांव्यतिरिक्त १३, २० आणि २७ फेब्रुवारीला बँका बंद आहेत. दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी १२ व २६ फेब्रुवारीलाही बॅंका बंद असल्याने फेब्रुवारीत ११ दिवस बँका बंद आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami