संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 05 July 2022

केंद्राचे नवे धोरण ‘बँकेचे पैसे लुटा आणि पळून जा; काँग्रेसचे मोदींवर टीकास्त्र

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – एबीजी शिपयार्डच्या बँका फसवणूक प्रकरणी काँग्रेसने भाजपवर हल्लाबोल केला आहे. मोदी सरकारच्या सात वर्षांत बँकांच्या नॉन परफॉर्मिंग एसेटमध्ये वाढ झाल्याचा आरोप काँग्रेसने रविवारी केला. काँग्रेस नेते काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सिंग सुरजेवाला यांनी नरेंद्र मोदी सरकारवर टीका करताना या एबीजी शिपयार्ड बँक घोटाळेबाज प्रकरणाला ‘लूट करा आणि पळून जा ‘ ही मोदी सरकारची नवी योजना असल्याचे म्हटले आहे.

काँग्रेसचे रणदीप सुरजेवाला यांनी रविवारी ट्विट करून मोदी सरकारला घेरले. ₹२,२०,००,००,००,८४२ लोकांच्या पैशांची फसवणूक झाल्याचे त्यांनी सांगितले. मोदी सकारच्या देरखरेखीखाली ७५ वर्षातील भारतातील सर्वात मोठी बँक फसवणूक झाल्याचा आरोप त्यांनी केला. गेल्या ७ वर्षात ₹ ५,४५,000 कोटींच्या ‘बँक फ्रॉड’ने आपली ‘बँकिंग सिस्टिम’ उद्ध्वस्त केली आहे. सुरजेवाला यांनी या ट्विटसोबत विधानाची एक प्रतही शेअर केली आहे. तसेच रणदीप सुरजेवाला आज पत्रकार परिषद घेऊन एबीजी शिपयार्डचा २२,८८४ कोटी रुपयांचा घोटाळा मोदीजींच्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संमतीने झाल्याचा आरोप केला आहे. या विधानानुसार, गेल्या सात वर्षांत बँकिंग उद्योगातून ५.३५ लाख कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. वास्तविक, एबीजी ग्रुपने बँकांशी केलेल्या फसवणुकीचा आकडा इतका मोठा आहे की बँकिंग घोटाळ्याचे सर्व रेकॉर्ड मोडीत निघाले आहेत. गुजरातमधील एबीजी शिपयार्ड आणि कंपनीचे तत्कालीन सीएमडी ऋषी अग्रवाल यांच्यासह आठजणांविरोधात सीबीआयने फसवणुकीचे गुन्हे दाखल केले. कंपनीने २८ बँकांची फसवणूक केली असून, फरार उद्योगपती विजय मल्या व हिरे व्यावसायिक नीरव मोदी यांनी केलेल्या फसवणुकीपेक्षाही हा घाटाळा मोठा आहे. याप्रकरणी आतापर्यंत ८ जणांना अटक करण्यात आली आहे. सध्या सीबीआयने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून लवकरच अन्य एजन्सीही तपासात सहभागी होऊ शकतात.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami