संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 31 March 2023

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
शिवजयंतीला कोल्हापूर दौर्‍यावर

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

कोल्हापूर- ज्योतीरादित्य शिंदे आणि नितीन गडकरी या दोन केंद्रीय मंत्र्यांनंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सुद्धा कोल्हापूर दौर्‍यावर येणार आहेत. अमित शाह हे १९ फेब्रुवारी या शिवजयंती दिनी दोन दिवस कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत,अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.तसेच या दौर्‍याच्या पूर्व तयारीची आढावा बैठक नुकतीच येथील जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच पार पडली.
या बैठकीत सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी परस्परात योग्य समन्वय ठेवून केंद्रीय गृहमंत्र्यांचा हा दौरा यशस्वी करावा, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.शाह यांच्या कोल्हापूर दौऱ्यासाठी भाजपकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. न्यू एज्युकेशन सोसायटीच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाला अमित शाह उपस्थित राहतील. तसेच करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर भेट, शिवाजी चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणार आहेत. दुपारी त्यांच्या उपस्थितीत भाजप कार्यालयासाठी घेतलेल्या नागाळा पार्कमधील नव्या जागेत मंदिर बांधकामाचा प्रारंभ होणार आहे.त्याठिकाणीच भाजप कार्यकर्त्यांचा मेळावाही होणार आहे. सायंकाळी लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून आयोजित लोकप्रवास योजनेंतर्गत होणाऱ्या मेळाव्याला ते उपस्थित राहाणार आहेत.
दरम्यान,चंद्रकांत पाटील आढावा बैठकीत सांगितले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणेने योग्य ती खबरदारी घ्यावी. तसेच १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती असल्याने व याच दिवशी कणेरी मठाच्या वतीने शहरात शोभायात्रा नियोजित आहे.तरी प्रशासनाने वाहतुकीचे योग्य ते नियोजन करावे व कोणत्याही कार्यक्रमाला वाहतुकीचा अडथळा होणार नाही, या दृष्टीने प्रयत्न करावेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या