संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 30 June 2022

केंद्रीय मंत्री डॉ.भागवत कराड यांच्या घराजवळ कॉँग्रेस कार्यकर्त्यार्ंचे आंदोलन

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

औरंगाबाद – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात आज औरंगाबादमधील काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या घराजवळ आंदोलन केले. आज सकाळीच शेकडो कार्यकर्ते क्रांती चौक येथे जमले होते. त्यानंतर हा मोर्चा केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांच्या घराकडे निघाला. मात्र पोलिसांनी त्यांना रस्त्यात अडवले. क्रांती चौकातच कार्यकर्त्यांना रोखल्यामुळे तेथेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात घोषणाबाजी करायला सुरुवात केली. यावेळी पोलिसांनी कॉँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते.

पंतप्रधान नरेेंद्र मोदी यांनी संसदेत अभिभाषणावेळी कॉँग्रेसवर जोरदार टीका केली होती. महाराष्ट्र कॉँग्रेसमुळे देशभरात कोरोना वाढला असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यांच्या या वक्तव्याविरोधात कॉँग्रेसने राज्यभरात भाजपा पदाधिकार्‍यांच्या घरासमोर आंदोलन सुरू केले आहे. त्यानुसार आज सकाळी केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांच्या घराजवळील क्रांती चौक येथे कॉँग्रेसचे कार्यकर्ते जमले होते. कॉँग्रेस कार्यकर्ते येणार असल्याचे समजताच भाजपा कार्यकर्तेेही भागवत कराड यांच्या घरी दाखल झाले होते. मात्र भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते आमने-सामने येऊ नये, यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त केला होता. तरीही काँग्रेसच्या मोठ्या जमावाने क्रांती चौकात मोठमोठ्याने घोषणाबाजी सुरु केली. यावेळी पोलिसांनी कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यार्ंना ताब्यात घेतले. या आंदोलनात महिलांचा सहभाग मोठया प्रमाणात होता.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami