संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 03 December 2022

केंद्रीय विद्यापीठांमध्ये हिंदीतून शिक्षण देणे बंधनकारक करा!

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – देशातील सर्व केंद्रीय विद्यापीठांमध्ये आणि उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये हिंदी भाषेतून शिक्षण बंधनकारक करावे,अशी शिफारस अमित शाह अध्यक्ष असलेल्या समितीने केली आहे.हिंदी भाषेतील शिक्षणासंबंधी संसदीय कार्यालयीन भाषा समितीने यासंबंधी अभ्यास केला आहे.

राष्ट्रपती कार्यालयाकडून मागील महिन्यामध्ये जारी करण्यात आलेल्या अहवालामध्ये हिंदी भाषेतून शिक्षणाची शिफारस करण्यात आली.टेक्निकल आणि नॉन टेक्निकल क्षेत्रातल्या संस्थांनी हिंदी भाषेतून शिक्षणाला प्राधान्य देण्याची गरज असून पर्याय नसेल अशा ठिकाणीच इंग्रजीचा वापर करण्याचे म्हटले होते.संसदेतील कार्यालयीन भाषा समितीचे अध्यक्ष अमित शाह आहेत.या समितीने हिंदी भाषा सर्व विद्यापीठ, केंद्रीय विद्यालय, टेक्निकल, नॉन टेक्निकल क्षेत्रामध्ये हिंदीचा वापर बंधनकारक असल्याचे म्हटले आहे.शिवाय आयआयटी,आयआयएम आणि एम्ससारख्या संस्थांमध्ये शिक्षणाची भाषा म्हणून इंग्रजीचा वापर होत आहे.तेथेही हळूहळू हिंदीचा वापर करण्याची शिफारस करण्यात आली आहे. जोपर्यंत विद्यापीठांमध्ये हिंदीतून शिक्षण सुरु होत नाही तोपर्यंत ही शिक्षणाची भाषा ठरणार नाही,असे अहवालामध्ये म्हटले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami