संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 09 December 2022

केंद्रीय सरकारी कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्यांची वाढ

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- केंद्र सरकारी कर्मचार्‍यांची दिवाळी आणखी गोड जाणार आहे. या कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला असून याचा फायदा 1 कोटींहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होणार आहे. या निर्णयामुळे आता केंद्रीय कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता 34 टक्क्यांवरून 38 टक्क्यांवर गेला आहे. ही वाढ जुलै ते डिसेंबर 2022 पर्यंत लागू असणार आहे. 7 व्या वेतन आयोगाच्या आधारे ज्या कर्मचार्‍यांचे मूळ पगार 18 हजार रुपये आहे त्या कर्मचार्‍यांच्या पगारात 720 रुपयांची वाढ होणार आहे. तर ज्याचा मूळ पगार 25 हजार असेल त्यांचा पगार 1 हजार रुपयांनी वाढेल.
तर 50 हजार मूळ पगार मिळवणार्‍यांना दरमहा 2 हजार रुपये वाढ मिळेल. 1 लाख रुपये मूळ पगार असणार्‍यांना महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ झाल्यानंतर 4 हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे.
गरीब अन्न योजना 3 महिन्यांनी वाढवली
पंतप्रधान गरीब कल्याण योजनेला 3 महिने मुदतवाढ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. आता या योजनेचा लाभ डिसेंबर 2022 पर्यंत सुरू राहणार आहे. यापूर्वी ही योजना सप्टेंबर 2022 रोजी संपत होती. केंद्राच्या या निर्णयामुळे देशातील 81 कोटींहून अधिक जनतेला पुन्हा एकदा दिलासा मिळाला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami