संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 06 July 2022

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे वर्क फ्रॉम होम बंद! राज्य सरकार काय निर्णय घेणार?

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सरकरी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम सुरु केलं होतं. कोरोनाचा जोर असताना कधी 25 टक्के तर कधी 50 टक्के कर्मचाऱ्यांनाच कार्यालयात उपस्थित राहून काम करण्याची सूचना देण्यात येत होती. पण आता देशातील कोरोनाची तिसरी लाट ओसरत असल्याने केंद्र सरकारने सर्व कर्मचाऱ्यांनी शंभर टक्के उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहे. महाराष्ट्रातही कोरोनाची तिसरी लाट ओसरत असल्याने राज्य सरकारही राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी शंभर टक्के उपस्थिती राहण्याचे आदेश देणर का असा सवाल उपस्थित होत आहे.

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी याबाबत माहिती देताना म्हणाले की, केंद्र सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना आता उपस्थित राहावं लागणार आहे.
केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयातील 100 टक्के उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. सरकारच्या वर्क फ्रॉम-होम सिस्टमने ५० टक्के कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची परवानगी दिली होती. आम्ही विविध विभागांकडून माहिती गोळा केली आणि परिस्थितीचा आढावा घेतला. सर्व प्रवर्गातील कर्मचाऱ्यांनी 7 फेब्रुवारीपासून कार्यालयात कोणतीही जागा रिक्त न ठेवता यावे. यापुढे घरातून काम करणारी यंत्रणा नसेल जितेंद्र सिंग म्हणाले

साथीच्या आजाराच्या प्रसारासंदर्भातील परिस्थितीचा आज आढावा घेण्यात आला. रुग्णांची घटलेली संख्या आणि पोझीटीव्हिटी रेट कमी होत असल्याने उद्यापासून कार्यालये पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व श्रेणीतील कर्मचाऱ्यांनी नियमितपणे कार्यालयात यावे. कोणतीही सवलत दिली जाणार नाही. हा आदेश ७ फेब्रुवारीपासून लागू होणार आहे.

देशात कोविडची प्रकरणे वाढू लागल्याने ३ जानेवारी रोजी केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांसाठी घरून काम मंजूर केले. अंडर सेक्रेटरी स्तरावरील ५० टक्के कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची परवानगी देण्याचा आदेश होता. हे सुरुवातीला 31 जानेवारी रोजी नियोजित होते परंतु नंतर वाढविण्यात आले. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत नव्या बाधित रुग्णांच्या संख्येने उच्चांक गाठला होता. त्यामुळे देशभरात भीतीचं वातावरण होतं. मुंबई आणि दिल्ली शहरांमध्ये काही दिवसांपूर्वी कोरोनाबाधितांच्या नव्या रुग्णसंख्येचा दररोज अक्षरश: विस्फोट व्हायचा. त्यामुळे चिंता वाढली होती. विशेष म्हणजे नवी दिल्लीत संसद भवनात शेकडो सरकारी कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली होती. तसेच मुंबईत विधान भवनात कोरोनाने शिरकाव केला होता. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने गेल्या महिन्यात वर्क फ्रॉम होमची सूचना दिली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खूप कमी कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात आली होती.

देशात दररोज सुमारे एक लाख कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. कोरोनाचा वाढता धोका पाहता काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी काही निर्बंध जाहीर केले होते. त्यानंतर ते निर्बंध ही की प्रमाणात शिथिल केले होते.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami