संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 21 May 2022

केजरीवालांची मोठी खेळी! विदर्भातील बड्या नेत्याला राज्यसभेवर पाठवणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email
Print

नवी दिल्ली – आगामी मुंबई महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्राच्या राजकारणात भक्कम पाय रोवण्याच्यादृष्टीने ‘आप’चे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोठी राजकीय खेळी केली आहे. विदर्भातील बडा राजकीय नेता असलेल्या उद्योगपतीला राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून पंजाबनंतर आता त्यांनी आपला मोर्चा महाराष्ट्राकडे कळवल्याचे स्पष्ट होते.
देशात सध्या राजकीय वातावरण बदलाचे वारे वाहत आहेत. त्याचा फायदा उठवण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष प्रयत्न करत आहेत. त्यासाठी ते पक्ष विस्तारावर भर देत आहेत. आपचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही महाराष्ट्रात पक्ष वाढवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यात ते विदर्भातील माजी खासदाराला राज्यसभेवर पाठवणार आहेत. त्याचा सकारात्मक परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर होणार आहे. त्याबाबत त्यांनी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासोबत चर्चा केली. १५ राज्यांमधील राज्यसभेच्या ५७ जागांची निवडणूक जाहीर झाली आहे. त्यात पंजाब आणि महाराष्ट्राचाही समावेश आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून एका बड्या नेत्याला आपल्या कोट्यातून राज्यसभेवर पाठवण्याची तयारी आपने सुरू केली आहे. त्याचा फायदा त्यांना आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत होऊ शकतो, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami