नवी दिल्ली:- मंडोली तुरुंगा कैद असलेल्या सुकेश चंद्रशेखर याने आणखी एक लेटर बॉम्ब टाकला आहे. या पत्रात त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. अरविंद केजरीवालांनी पैसे देऊन पेड न्यूज छापल्या आहे. परदेशी माध्यमांना आपल्या बातम्या छापायला ८.५० डॉलर्स दिल्याचा दावा त्याने या पत्रातून केला आहे. निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर या आरोपांमुळे केजरीवाल यांच्या समोर नवे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे.
सुकेश चंद्रशेखर याने पत्रात लिहिले की, न्यूयॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन पोस्ट आणि टाईम्स मॅगझिनसारख्या वृत्तपत्रांमध्ये पीआर एजंटच्या माध्यमातून दिल्लीतील सरकारी शाळांच्या जाहिरातीसाठी पैसे देऊन पेड न्यूज प्रकाशित करण्यात आल्या होत्या. मार्क आणि वेरोनिका या वृत्तपत्रांच्या पीआर एजंट्सच्या माध्यमातून ही पेड न्यूज 8,50,000 अमेरिकन डॉलर्स देऊन प्रकाशित करण्यात आली.
तो पुढे लिहितो की, माझ्यावर केलेल्या आरोपांसाठी माझी पॉलीग्राफ चाचणी करण्याची तयार आहे. अरविंद केजरीवालांनीही ही चाचणी करण्याची हिंमत दाखवावी.सुकेशने आपले वकील अशोक सिंह यांच्या मार्फत लेटर बॉम्ब टाकत थेट दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनाच आव्हान दिले आहे.