संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

‘केजीएफ’ फेम अभिनेता कॅन्सरने त्रस्त! तीन वर्षे आजार गुप्त ठेवल्याचे उघड

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई-दाक्षिणात्य सुपरस्टार यशच्या ‘केजीएफ’ सिनेमात खासीम चाचाची भूमिका साकारणारे ज्येष्ठ कन्नड अभिनेते हरीश रॉय कर्करोगाशी झुंज देत आहेत. हरीश रॉय कर्करोगाच्या चौथ्या स्टेजला आहेत. अलीकडेच त्यांनी एका यूट्यूबरला दिलेल्या मुलाखतीदरम्यान त्यांच्या प्रकृतीबद्दल सांगितले.गेल्या तीन वर्षांपासून कर्करोगाने ग्रस्त असल्याचा धक्कादायक खुलासा अभिनेत्याने यावेळी केला. ‘केजीएफ’ चित्रपटाच्या शूटिंदगरम्यान देखील हरीश रॉय कर्करोगाशी झुंज देत होते.एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की, यापूर्वी त्यांना थायरॉईड होता,ज्याने कर्करोगाचे रूप धारण केले आहे.गेल्या तीन वर्षांपासून ते कर्करोगाने त्रस्त असून त्यांच्याकडे उपचारासाठीही पैसे देखील नाहीत.
अनेक प्रकल्प गमावण्याची भीती असल्याने अभिनेत्याने आपला आजार बराच काळ गुप्त ठेवला होता.एवढंच नाही तर हरीश रॉय यांच्याकडे पैसे नसल्यामुळे त्यांनी शस्त्रक्रिया पुढे ढकलली. पैसे मिळतील या आशेत हरीश रॉय ‘केजीएफ – चाप्टर २’ च्या रिलीजची वाट पाहात होते.पण आता हरीश रॉय यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. हरीश रॉय म्हणातात, ‘मी तीन वर्षांपासून कर्करोगाशी लढा देत आहे. केजीएफच्या शूटिंगदरम्यान मी लांब दाढी ठेवण्याचे एक कारण म्हणजे आजारामुळे माझा चेहरा सुजला होता.सूज लपविण्यासाठी मी दाढी वाढवली.’शिवाय हरीश रॉय यांनी चाहते आणि उद्योग विश्वातील व्यक्तींकडून लोकांकडून मदत घेण्यासाठी एक व्हिडीओ रेकॉर्ड केला होता, परंतु व्हिडीओ ते पोस्ट करू शकले नाहीत.केजीएफ चाप्टर २’ च्या रिलीजची वाट पाहात होते.पण आता हरीश रॉय यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. हरीश रॉय म्हणातात, ‘मी तीन वर्षांपासून कर्करोगाशी लढा देत आहे.केजीएफच्या शूटिंगदरम्यान मी लांब दाढी ठेवण्याचे एक कारण म्हणजे आजारामुळे माझा चेहरा सुजला होता.सूज लपविण्यासाठी मी दाढी वाढवली.’शिवाय हरीश रॉय यांनी चाहते आणि उद्योग विश्वातील व्यक्तींकडून लोकांकडून मदत घेण्यासाठी एक व्हिडीओ रेकॉर्ड केला होता,परंतु व्हिडीओ ते पोस्ट करू शकले नाहीत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami