नवी दिल्ली- भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने नवीन टॅरिफ ऑर्डर 2.0 मध्ये सुधारणा केली आहे. आता केबल आणि डीटीएच ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. ट्रायचे हे नवीन नियम 1 फेब्रुवारी 2023 पासून लागू होतील. ट्रायच्या मते, टेलिव्हिजन चॅनेलचे सर्व वितरक हे निश्चित करतील की, 1 फेब्रुवारी 2023 पर्यंत, ग्राहकांना प्लॅन किंवा त्यांनी निवडलेल्या चॅनेलनुसार सेवा प्रदान केल्या जातील.नवीन नियमानुसार, 19 रुपयांपेक्षा कमी किमतीचे चॅनेल एका प्लॅनमध्ये सामील होऊ शकतील. ट्रायचे सचिव व्ही. रघुनंदन यांनी नवीन नियमांबाबत अधिसूचना जारी केली आहे. नवीन अधिसूचनेनुसार, सर्व वितरक त्यांच्या पे चॅनेलची किंमत निश्चित करताना, प्लॅन असलेल्या सर्व पे चॅनेलच्या किंमतीवर जास्तीत जास्त 45 टक्के सूट देऊ शकतात. सध्या फक्त 33 टक्के सूट दिली जाऊ शकते.