संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 09 December 2022

केरळमधील मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नावर ९ सप्टेंबरला सुप्रीम कोर्टात सुनावणी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली- केरळमधील मोकाट कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर स्वरुपात पुढे आला असून आता ययाबाबत शुक्रवार ९ सप्टेंबर या अनंत चतुर्दशीच्या दिवशी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.सुप्रीम कोर्टातील वकील व्ही.के. बिजू यांनी यासंदर्भातील दाखल याचिकेवर सरन्यायाधीश यु.यु.लळीत यांच्यासमोर आपला युक्तिवाद केल्यानंतर सरन्यायाधीश ललित यांनी यावर ९ सप्टेंबरला सुनावणी घेण्याची संमती दिली. सुप्रीम कोर्टातील वकील व्ही.के.बिजू यांनी सुप्रीम कोर्टासमोर सांगितले की, केरळमधील मोकाट कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला आहे.मागील पाच वर्षात अशा कुत्र्यांनी तब्बल ५ लाख लोकांना चावा घेतला आहे. धक्कादायक बाब अशी की,एका १२ वर्षांच्या मुलीला कुत्रा चावल्यानंतर रेबीज इंजेक्शन देऊनही तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. २०१७ मध्ये अशाच भटक्या कुत्र्यांना ठार मारण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाली होती.त्यावेळी न्यायालयाने अशा मागणीस नकार दिला होता.मात्र त्यावेळी न्या.सिरी जगन आयोगामार्फत या समस्येबाबत एक समिती नेमण्यात आली होती.या समितीने एक अहवाल सुप्रीम कोर्टात सादर केला आहे.त्यातून केरळमध्ये मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण झाला असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. रात्री-अपरात्री ही मोकाट कुत्री नागरिकांच्या शरीराचे लचके तोडत आहेत.त्यामुळे राज्यातील अनेक भागात मोकाट कुत्र्यांची दहशत निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami