संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 05 July 2022

केळशी किनाऱ्यावर “सावनी” ने घातली अंडी; रिडले कासवांच्या अधिक विणीचे रहस्य उघड

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मंडणगड – काही दिवसांपूर्वी पाठीवर सटेलाईट ट्रान्समीटर लावून आंजर्ले किनाऱ्यावर सोडलेल्या ‘ सावनी ” नावाच्या ओलिव्ह रिडले जातीच्या मादी कासवाने पुन्हा एकदा अंडी घातल्याचे केळशी किनाऱ्यावर उघडकीस आले आहे. यातून अशा प्रजातीच्या कासवांच्या माद्या विणीच्या हंगामात एकापेक्षा जास्त वेळा वीण करत असल्याचे आतापर्यंतचे रहस्य उघड झाले आहे.

यावर्षी जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात वेलास, आंजर्ले आणि गुहागर या ठिकाणच्या समुद्र किनाऱ्यावर अशा पाच मादी कासवांच्या पाठीवर वनविभाग आणि भारतीय वन्यजीव संस्थेने सॅटेलाईट ट्रान्समीटर त्यांना पुन्हा समुद्रात सोडले होते. या मादी कासवांच्या हालचालीवर भारतीय वन्यजीव संस्था आणि मंग्रोव्ह फौन्डेशनचे संशोधक लक्ष ठेवून होते. दरम्यान शुक्रवारी यातील एक मादी केळशीच्या अंडी घालताना कासवमित्र राकेश धोपावकर आणि लहू धोपावकर यांनी बघितले आणि लगेच ही माहिती मंग्रोव्ह फौन्डेशनला दिली. अंडी घातलेली कासव मादी सावनी ही होती. कारण गेल्या महिन्यात २५ जानेवारी रोजी याच सावनी नाव ठेवलेल्या मादीने ८७ अंडी घातली होती. त्यानंतर तिनेच २५ फेब्रुवारी रोजी पहाटे चार वाजता पुन्हा ७६ अंडी घातल्याची माहिती समोर आली आहे.या मादीचा गेल्या महिनाभरातील प्रवास १० किमी अंतरात होता.ती सावित्री नदीच्या मुखाशी गेली होती.शेवटी वेळास व आंजर्ले प्रवास करत ती केळशी किनाऱ्यावर आली आणि तिथे तिने अंडी घातली अशी माहिती सावनीवर लक्ष ठेवून असलेले भारतीय वन्यजीव संस्थेचे संशोधक डॉ.सुरेश कुमार यांनी सांगितले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami