संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

केसरकर हेच आमचे मुख्य प्रवक्ते आहेत उदय सामंतांच्या ट्विटमुळे वादावर पडदा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – शिवसेना भाजपाची युती का आणि कोणामुळे होऊ शकली नाही याचा गौप्यस्फोट करणारे दीपक केसरकर याना शिंदे गटाच्या प्रवक्तेपदावरून हटवल्याच्या बातम्या पसरल्या होत्या. मात्र या बातम्या म्हणजे अफवा आहेत. केसरकारांना प्रवक्तेपदावरून हटवले नाही आताही तेच आमचे मुख्य प्रवक्ते आहेत असे ट्विट शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी केले आहे. त्यामुळे आता या वादावर पडदा पडला आहे
शुक्रवारी दीपक केसरकर यांनी एक पत्रकार परिषद घेऊन शिवसेना भाजपाची युती का होऊ शकली नाही याबाबतचा गौप्यस्फोट करताना नारायण राणे यांचे नाव घेतले होते. त्यांनी सांगितले कि शिवसेना भाजप युती होणार होती पण नारायण राणे याना केंद्रीय मंत्रिमंडळात घेण्यास उद्धव ठाकरे यांचा विरोध होता .

कारण राणेंनी पत्रकार परिषद घेऊन सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणात आदित्यची बदनामी केली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे नाराज होते. असे केसरकर यांनी म्हटले होते. त्यामुळे नारायण राणे नाराज झाले. केसरकर यांच्या पत्रकार परिषदेनंतर आमदार नितेश राणे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त केली त्यानंतर शिंदे गटाचे सचिव किरण पावसकर यांनी राणेंची भेट घेऊन त्यांची समजूत काढली आणि त्यानंतर दीपक केसरकार याना शिंदे गटाच्या मुख्य प्रवक्ते पदावरून हटवून किरण पावसकर याना मुख्यप्रवक्ते केल्याच्या बातम्या येऊ लागल्या.मात्र आज शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी ट्विट करून केसरकर हेच आमचे मुख्य प्रवक्ते असतील आणि त्यात कोणताही बदल केला जाणार नाही अफवांवर कुणी विश्वास ठेऊ नये असे आपल्या ट्विट मध्ये म्हटल्याने याबाबतच्या चर्चाना आता पूर्णविराम मिळाला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami