हैदराबाद : आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री वाय एस राजशेखर रेड्डी यांची कन्या शर्मिला रेड्डी यांनी काही महिन्यांपूर्वी वाय.एस.आर तेलंगणा काँग्रेस पक्षाची स्थापना केली.त्यानंतर तेलंगणामध्ये आपल्या पक्षाचा जम बसवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.त्यामुळे केसीआर सरकार कशाप्रकारे नागरिकांना न्याय देत नाही किंवा त्यांची धोरणे जनविरोधात आहेत.हे दाखवण्यासाठी रेड्डी यांची तेलंगणामध्ये पदयात्रा काढली.3 हजार किमी यात्रा पूर्ण झाली असून पुढील पदयात्रेसाठी परवानगी नाकारल्यामुळे रेड्डी यांनी केसीआर सरकारविरोधात आंदोलन छेडले आहे.
केसीआर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी 10 दिवसांपूर्वी रेड्डी यांच्यावर हल्ला केला होता.त्या हल्ल्यानंतर पोलिसांनी त्यांना हैदराबाद येथे नेले होते.मात्र दुसऱ्या दिवशी रेड्डी यांनी केसीआर यांचे मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला होता.त्यावेळीसुद्धा पोलिसांनी त्यांना रोखले होते.त्यामुळे त्यांच्या पदयात्रेला पुढील परवानगी मिळत नसल्याने हायकोर्टात धाव घेतली होती. हायकोर्टाने पोलिसांना परवानगी देण्याची सूचना दिली होती.मात्र तरीही परवानगी मिळत नसल्याने शर्मिला रेड्डी यांनी आज बेमुदत आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता. हुसेन सागरजवळ डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ त्या उपोषणाला बसणार होत्या.मात्र तत्पूर्वी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन घरी पाठवले.दरम्यान,तेलंगणामध्ये पुढील वर्षी होणाऱ्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या घडामोडींमुळे राजकीय वातावरण तापले आहे.