पुणे- केेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांचा नुकताच पुण्यासह बारामतीचा दौरा पार पडला होता. त्यानंतर आता पुढच्याच महिन्यात डिसेेंबरमध्ये त्या पुन्हा बारामती दौर्यासाठी येणार आहेत. तत्पूर्वी त्यांच्या या दौर्याच्या तयारीसाठी केेंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेल बारामती लोकसभा मतदार संघाच्या दोन दिवसीय दौर्यावर येणार आहेत. 11 नोव्हेेंबर रोजी ते खडकवासला मतदारसंघात जाणार आहेत. त्यानंतर ते पहिल्या दिवशी भोर विधानसभा मतदार संघ, पुरंदर विधानसभा मतदारसंघ आणि शेवटी बारामती मतदारसंघ असा प्रवेश असेल. दुसर्या दिवशी इंदापूर, दौैंड विधानसभा मतदारसंघात दौरा करतील. त्यानंतर ते पुण्यात कौन्सिल हॉल येथे पत्रकारांशी संवाद साधतील अशी माहिती भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे यांनी दिली.