सिंधुदुर्ग – केेंद्रीय मंत्री नारायण राणेेंच्या मुंबईतील अदिश बंगल्याच्या पाहणीनंतर आता सिंधुदुर्गातील मालवण चिवला बिचवरील नीलरत्न बंगल्यावर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. केेंद्र सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेेंट फॉरेस्ट अॅण्ड क्लायमेट चेेंज नागपूर कार्यालयाने हे आदेश दिले आहेत. या आदेशामुळे नारायण राणे यांना मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.
एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने नारायण राणे यांनी मालवण चिवला बिचवर असलेला नीलरत्न बंगला बांधताना सीआरझेड 2 चे उल्लंघन झाले होते अशी तक्रार ऑगस्ट 2021 ला केली होती. त्यानंतर तक्रारीची कॉपी आपल्याला मिळाल्याची माहिती माहिती अधिकार कार्यकर्त्याने दिली आहे. त्यानुसार केेंद्र सरकारच्या मिनिस्ट्री ऑफएन्व्हायरमेेंट फॉरेस्ट अॅण्ड क्लायमेट चेेंज नागपूर कार्यालयाने महाराष्ट्र पोस्टल जीवन प्राधिकरणला कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. आता या कारवाईमुळे पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपा यांच्यातील वाद उफाळून येणार का? अशा चर्चांना उधाण आले आहे.