नवी दिल्ली : केंद्र सरकारने कॅनरा बँकेचे नवीन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून के सत्यनारायण राजू यांची नियुक्ती केली आहे. सत्यनारायण यांनी एल.व्ही. प्रभाकर यांची जागा घेतली आहे. गेल्या वर्षी ३१ डिसेंबर २०२२ रोजी त्यांचा कार्यकाळ संपला होता. त्यामुळे आता सत्यनारायण राजू यांची या पदावर ७ फेब्रुवारी २०२३ पासून नियुक्ती करण्यात आली आहे.
कॅनरा बँकेच्या निवेदनानुसार, नवनियुक्त सीईओ आणि एमडी राजू यांना बँकिंग क्षेत्रातील सर्व विभागांचा मोठा अनुभव आहे. राजू हे भौतिकशास्त्रात पदवीधर आणि व्यवसाय प्रशासन मध्ये पदव्युत्तर पदवीधर आहेत. नवनियुक्त सीईओ आणि एमडी के. सत्यनाराण राजू जे १९८८ पूर्वी विजय बँकेत रुजू झाले आणि बँक ऑफ बडोदामध्ये मख्य महाव्यवस्थपक पदापर्यंत पोहोचले. त्यांच्या ३३ वर्षाच्या दीर्घ बँकिंग कारकिर्दीत त्यांनी १२ वर्षे विविध शाखांचे प्रमुख म्हणून नेतृत्व केले आहे.