संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 09 December 2022

कॉंग्रेसच्या चार सदस्यांनी केली गद्दारी! शहाद्यात ५० खोके एकदम ओकेचा नारा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नंदुरबार – भाजपची नीती दिवसेंदिवस घसरत चालल्याची चर्चा नंदुरबारच्या राजकारणात ऐकायला मिळत आहे. कारण शहादा पंचायत समितीमध्ये भाजपाने स्वतःकडे बहुमत असूनही कॉंग्रेसचे चार सदस्य फोडण्याचा प्रयत्न केला आहे.या पंचायत समितीच्या सभापती,उपसभापती निवडणुकीमध्ये कॉंग्रेसच्या चार सदस्यांनी गद्दारी केल्याने परत एकदा ‘पन्नास खोके एकदम ओके’चा नारा ऐकायला मिळाला आहे.

स्वतःकडे बहुमत असुन देखील भाजपने कॉंग्रेसचे चार सदस्य फोडुन त्यांना मतदानावेळी अनुपस्थित ठेवल्याने कॉंग्रेसवर पराभवाची नामुश्की ओढवली.सर्वच सदस्य हे मतदानावेळी अनुपस्थित राहीले.त्यामुळे पंचायत समितीतील कॉग्रेस सदस्यांनी बंडखोर कॉंग्रेस सदस्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत पन्नास खोके एकदम ओके चा नारा दिला.शहादा पंचायत समितीच्‍या २८ सदस्य संख्या असलेल्या पंचायत समितीमध्ये कॉग्रेसचे १४, राष्ट्रवादीचे २ तर भाजपचे १२ सदस्य संख्या आहे. काल गुरूवारी झालेल्या निवडणुकीत भाजपाचे सदस्य हे सभापती उपसभापती म्हणुन विराजमान झाले आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami