तिरुवनंतपुरम : ‘कांतारा’ हा चित्रपट चर्चेत आहे तो ‘वराह रूपम’ या गाण्यामुळे. चित्रपटाच्या निर्मात्यांवर या गाण्याबाबत चोरीचा आरोप आहे. दुसरीकडे या प्रकरणात मल्याळम अभिनेता आणि पृथ्वीराज सुकुमारन याचेही नाव आहे. मात्र, सध्या त्याला केरळ उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने पृथ्वीराज सुकुमारनविरुद्ध कॉपीराइट उल्लंघनाच्या आरोपाखाली एफआयआरला स्थगिती दिली आहे.
चित्रपटाच्या निर्मितीमध्ये किंवा संगीत निर्मितीमध्ये त्याचा सहभाग नव्हता, असे न्यायमूर्ती बेचू कुरियन थॉमस यांच्या एकल खंडपीठाकडून निरीक्षण नोंदवले गेले. त्यामुळे न्यायालयाने या अभिनेत्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या एफआयआरला २२ फेब्रुवारीपर्यंत अंतरिम स्थगिती देण्याचे आदेश दिले आहे.