संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 18 August 2022

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणात येत्या २३ ऑगस्टला दोष निश्चिती होणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

*तावडे,कळसकर, अंदुरेसह
१० जण न्यायालयात हजर

कोल्हापूर – सामाजिक चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या खूनप्रकरणी शुक्रवारी जिल्हा व सत्र न्यायालयात दोष निश्चिती करण्यात येणार होती. पानसरे हत्या प्रकरणातील डॉ. विरेंद्र तावडे, शरद कळसकर व सचिन अंदुरेसह १० संशयितांना त्यावेळी हजर करण्यात आले होते, मात्र या प्रकरणाची सुनावणी पुढील तारखेला घेण्याची विनंती आता सरकारी पक्षातर्फे करण्यात आली आहे. सरकारी पक्षाच्या मागणीप्रमाणे जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. तांबे यांनी दोष निश्चितीसाठी २३ ऑगस्टला आता सुनावणीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे गोविंद पानसरे खटल्याच्या तारखेकडे आता सगळ्यांच्या आता नजरा लागल्या आहेत.कोल्हापुरात काल शुक्रवारी जिल्हा व सत्र न्यायालयात ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या खूनप्रकरणी १० संशयितांना हजर करण्याचे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले होते.
त्यानुसार बंगळूरू येथील कारागृहातून अमोल काळे, वासुदेव सूर्यवंशी,भारत कुरणे,अमित डेगवेकर, अमित बद्दी,गणेश मिस्कीन या सहाजणांना कर्नाटक पोलिसांकडून हजर करण्यात आले, तर पुण्यातील येरवडा कारागृहातून डॉ. वीरेंद्र तावडे, शरद कळसकर, सचिन अंदुरे या तीन संशयिताना दुपारी न्यायालयात हजर गेले केले. यापूर्वीच जामिनावर सुटलेला आणखी एक संशयित समीर गायकवाड असे एकूण दहा संशयित न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. मात्र या प्रकरणातील अन्य दोघे संशयित फरार असल्यामुळे आणि एटीएसकडे वर्ग करण्याच्या संदर्भातील माहितीची प्रतही प्राप्त झाली नसल्याने पुढील तारखेची मागणी करण्यात आली होती,त्याप्रमाणे न्यायालयानेही ही मागणी पूर्ण केली .

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami