संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 30 September 2022

कोंबड्याच्या झुंजीला मान्यता द्या! नागपूर खंडपीठात जनहित याचिका

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नागपूर- कोंबड्याच्या झुंजीला अधिकृत खेळाची मान्यता द्या अशा मागणीची जनहित याचिका गजेंद्र चाचरकर या शेतकऱ्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केली आहे. त्यात केंद्र आणि राज्य पशुसंवर्धन विभागाचे सचिव व पशुसंवर्धन अतिरिक्त आयुक्त यांना प्रतिवादी केले आहे. या याचिकेवर उद्या बुधवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.

प्राणी व पक्षांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करणारा कायदा देशात लागू झाला. तेव्हापासून कोंबड्यांची झुंज आयोजित करण्यास बंदी आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी २०१८ मध्ये पारंपरिक पद्धतीने कोंबडा झुंजीला परवानगी दिली. या सशर्त परवानगीत झुंजीत धारदार ब्लेड, जुगार आणि सट्टा लावण्यास मनाई आहे. या शिवाय देशात अनेक ठिकाणी बंदी झुगारून कोंबड्याच्या झुंजी आयोजित केल्या जातात. आंध्र प्रदेशात २०१९ मध्ये कोंबड्याची झुंज आयोजित केली होती. तेव्हा ३ दिवसांत ९०० कोटींची उलाढाल झाली. ही बाब लक्षात घेता कोंबडा झुंज अधिकृत केली तर ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. या खेळामुळे कुकुट पालन आणि कोंबड्यांचे देशी वाण संरक्षित होण्यास प्रोत्साहन मिळेल. देशात क्रिकेटवर सट्टा लावला जातो. पण म्हणून क्रिकेटवर बंदी घातलेली नाही. कोंबड्याचे मटण आहारात खाण्यावर बंदी नाही. मग कोंबडा झुंजीवर बंदी कशासाठी? असा सवाल चाचरकर यांनी याचिकेत विचाला आहे. यावर उद्या बुधवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami