संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 08 August 2022

कोकणचो नाद नाय करायचो! बारावीत बाजी, निकाल जाहीर

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – कोरोना काळात यंदा ऑफलाईन पद्धतीने झालेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल कधी जाहीर होणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. अखेर ही प्रतीक्षा आज संपली. आज बारावीचा निकाल जाहीर झाला. दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकण विभागाने या निकालात बाजी मारली आहे. एकूण निकाल ९४.२२ टक्के इतका लागला असून निकालात मुलींनी बाजी मारली आहे. बारावीत ९५.३५ टक्के विद्यार्थिनी, तर ९३.२९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

राज्य मंडळाने विविध वेबसाइटवरून विद्यार्थ्यांना निकाल पाहण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. हा निकाल विद्यार्थी खालील वेबसाईटवर पाहू शकतील. तसेच विद्यार्थ्यांना बारावीच्या गुणपत्रिका १७ जून २०२२ रोजी दुपारी ३ वाजता त्यांच्या कनिष्ठ महाविद्यालयात मिळणार आहेत.

mahresult.nic.in

mahahsscboard.in

hscresult.mkcl.org

विभागवार निकाल खालीलप्रमाणे –

कोकण विभाग: ९७.२१ टक्के
पुणे: ९३.६१
नागपूर: ९६.५२
औरंगाबाद: ९४.९७
मुंबई: ९०.९१
कोल्हापूर: ९५.०७
अमरावती: ९६.३४
नाशिक: ९५.०३
लातूर: ९५.२५

शाखानिहाय निकाल खालीलप्रमाणे –

विज्ञान – ९८.३० टक्के
कला – ९०.५१ टक्के
वाणिज्य – ९१.७१ टक्के
व्यवसाय अभ्यासक्रम – ९२.४० टक्के

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami