संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 06 July 2022

कोणतीही सूचना न देता पालिकेने अचानक बंद केला उड्डाणपूल

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पुणे – शुक्रवारी दुपारी हडपसर उड्डाणपुलाची पाहणी केल्यानंतर महापालिकेने अचानक दोन्ही बाजूचा उड्डाणपूल सर्व वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद केला. याबाबत वाहतूक विभागाला कसलीही माहिती देण्यात आली नव्हती. परिणामी पुणे-सोलापूर रोड आणि सोलापूर-पुणे रोड या दोन्ही दिशेच्या मार्गाला वाहनांच्या तब्बल पाच ते सात किलोमीटर अंतरापर्यंत रांगाच्या रंग लागल्या होत्या. वाहनचालकांना त्यामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

दरम्यान, अचानक उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने वाहनचालक दोन तासांहून अधिक काळ वाहतूक कोंडीत अडकेले होते. ही कोंडी फोडण्यासाठी हडपसर वाहतूक पोलीस युद्ध पातळीवर प्रयत्न करत असल्याचे दिसून आले. हडपसर वाहतूक विभागाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा झेंडे यांनी याबाबत माहिती दिली आहे. झेंडे यांनी सांगितले की, हडपसर उड्डाणपूल जड वाहनासाठी आम्ही बंद केला होता, मात्र अचानक महापालिकेच्या पथकाने उड्डाणपूलाची पाहणी करून पूर्ण उड्डाणपूल सर्वच वाहनांसाठी बंद केला आहे. त्यामुळे चहूबाजूला कोंडी झाली आहे, असेही त्या म्हणाल्या. दरम्यान,ही कोंडी लवकरात लवकर मोकळी करावी, अशी मागणी या वाहतूक कोंडीत अडकलेल्या नागरिकांकडून करण्यात आली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami