मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात नाराज असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या. मात्र मी नाराज असल्याचे मला मीडियामुळे समजले. मी नाराज नव्हतोच, कोणी सांगितले मी नाराज होतो’ असा उलटप्रश्न काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांना केला आहे. तर आता या संपूर्ण नाराजी नाट्यावर पडदा टाकत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी काँग्रेसमध्ये कोणताही वाद नसल्याचा दावा टिळक भवन येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत केला.
थोरात यांनी मी नाराज असल्याचे कधीच व्यक्त केले नसल्याचे माध्यमांसमोर स्पष्ट केले. बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ नेते पदाचा राजीनामा देखील दिला होता. मात्र आता थोरात आणि पटोले यांनी एकत्र पत्रकार परिषद घेत या नाराजींच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
दुसरीकडे नागपूर आणि अमरावतीच्या निवडणूक जिंकण्यासाठी भारतीय जनता पार्टीकडूनच संपूर्ण माहौल तयार करण्यात आल्याचा गंभीर आरोप यावेळी नाना पटोले यांनी केला. पण विरोधकांना अपेक्षित होते ते काही होऊ शकले नसल्याचे स्पष्ट करत, मी सातत्याने सांगत होतो त्याप्रमाणे काँग्रेसमध्ये कुठेही वाद नाही. त्यामुळे नागपूर आणि अमरावतीच्या निवडणूकासाठी भाजपकडून जे वातावरण र्निर्माण केले गेले होते त्याला आता पूर्ण विराम मिळाला आहे. त्यामुळे कसबा आणि चिंचवड येथील म्हविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणण्याचा आमचा पुढचा संकल्प असल्याचा निर्णय या कार्यकारणीमध्ये घेतला असल्याचेहि नानांकडून या परिषदेत स्पष्ट करण्यात आले.