सातारा – कोयना परिसराला आज सकाळी ६.३४ वाजता भूकंपाचा धक्का बसला. भूकंपमापन यंत्रावर त्याची तीव्रता २.८ रिश्टर स्केल नोंद झाली. या सौम्य भूकंपात कोणतीही हानी झाल्याचे वृत्त नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. कोयना परिसरात आज सकाळी भूकंपाचा सौम्य हादरा जाणवला. २.८ रिश्टर स्केलच्या या भूकंपाचा केंद्रबिंदू हेळवाक गावापासून नैऋत्येला ५ किलोमीटरवर होता. या भूकंपात कोणतीही जीवित आणि वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.