संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 06 July 2022

कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी रश्मी शुक्लांची ६ तास साक्ष

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – कोरेगाव भीमा दंगल प्रकरणाची चौकशी करत असलेल्या आयोगासमोर पुण्याच्या माजी पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांची साक्ष झाली. तब्बल ६ तास आयोगासमोर त्यांची साक्ष नोंदवण्यात आली. यावेळी त्यांनी पुराव्यासह प्रतिज्ञापत्रही आयोगाला सादर केले. त्यानंतर आता विश्वास नांगरे पाटील यांनाही चौकशीसाठी आयोग बोलावणार आहे. मात्र त्याची नेमकी तारीख ठरलेली नाही, असे आयोगाच्या वकिलांनी सांगितले.

कोरेगाव-भीमा प्रकरणाची चौकशी करत असलेल्या आयोगासमोर पुण्याच्या माजी पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांची साक्ष झाली. ६ तास त्यांनी साक्ष नोंदवली. मात्र त्याबाबत कोणतीही माहिती देण्यास नकार दिला. आयोगाच्या चौकशीला शुक्‍ला यांनी संपूर्ण सहकार्य केले, अशी माहिती सरकारी वकील शिशिर हिरे यांनी दिली. त्यानंतर तत्कालीन कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनाही चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता आहे. आयोगाचे वकील आशिष सातपुते यांनी नांगरे पाटलांना चौकशीसाठी बोलवावे. अशा मागणीचा अर्ज केला आहे. त्यानुसार आयोग त्यांना चौकशीसाठी बोलावणार आहे. मात्र त्याची तारीख ठरलेली नाही, असे त्यांनी सांगितले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami