संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना क्षयरोग होण्याचा मोठा धोका

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- कोरोनाची चौथी लाट रोखण्यात यश आल्यानंतर आता कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना क्षयरोगाची लागण होण्याचा मोठा धोका असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.या पार्श्वभूमीवर मुंबईत क्षयरोगाच्या संशयितांचा शोध घेण्याची मोहीम सुरू करण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ.मंगला गोमारे यांनी दिली.या मोहिमेतून ५० लाख लोकांची तपासणी केली जाणार असून आरोग्यसेविका,अशा वर्कर्सच्या माध्यमातून १ लाखामागे साडेतीन हजार संशयितांचा शोध घेतला जात आहे.
मुंबई महापालिकेच्या या क्षयरोग सर्व्हेक्षण मोहिमेंतर्गत साधारण ९ लाख ८६ हजार घरांमधील ४० लाख ३४ हजार ५१३ जणांची तपासणी केली जाणार आहे.यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाने स २ हजार ८२९ पथके सकाळी ९ ते ४ यावेळेत घरांना भेटी देणार आहेत.या प्रत्येक पथकात एक महिला,एकारोग्य स्वयंसेविका आणि एक पुरुष स्वयंसेवक आणि तीन व्यक्तींचा समावेश आहे.जर भेटीवेळी घरातील एखादा सदस्य उपलब्ध नसेल तर त्या घराला पुन्हा भेट दिली जाणार आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami