कोरोना बाबत महाराष्ट्रासह १३ राज्यांना केंद्र सरकारचे पत्र

corona, coronavirus, virus-5401250.jpg
Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp
Share on telegram
Telegram
Share on email
Email
Share on print
Print

दिल्ली – कोरोनाचा प्रादुर्भाव भलेही काही प्रमाणात कमी झालेला असला तरी अजूनही धोका टळलेला नाही. त्यामुळे कोरोना चाचण्या आणि लसीकरण याबाबत केंद्राने काही महत्वपूर्ण सूचना महाराष्ट्रासह १३ राज्यांना केल्या आहेत . केंद्रीय आरोग्य सचिवांनी ज्या १३ राज्यांना पत्र लिहले आहे त्यात महाराष्ट्र नागलेंड, सिक्कीम,केरळ, गोवा ,मणिपूर, मेघालय, मिझोरम,पंजाब, राजस्थान,पश्चिम बंगाल, जम्मू काश्मीर आणि लडाख या राज्यांचा समावेश आहे.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी १३ राज्यांना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे की ज्या राज्यांमध्ये कोरोना. रुग्णांचे प्रमाण आणि मृत्यूचे प्रमाण जास्त आहे तेथे कोरोना चाचण्यांमध्ये वाढ करायला सांगितले आहे. जगातील काही देशांमध्ये तिसऱ्या आणि चौथ्या लाटेचा हाहाकार सुरु असल्याने, आपल्याकडेही हिवाळ्यात कोरोनाचा संसर्ग वाढू नये याची काळजी घ्यावी लागेल असे राजेश भूषण यांनी पत्रात म्हटले आहे. तसेच कोरोनाविरोधी लढ्यात देशात वेगाने लसीकरण मोहीम सुरु आहे, मात्र दुसऱ्या बाजूला कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे स्थानिक भाषेत मोबाईलच्या माध्यमातून आयव्हीआर संदेश देण्याचा सल्लाही भूषण यांनी पत्रात दिला आहे. ज्यांना पहिला डोस मिळाला आहे आणि दुसरा द्यायचा आहे त्या साठीचे संदेश स्थानिक व्यक्ती ज्याचा त्या भागात प्रभाव आहे अशा व्यक्तीच्या आवाजात रेकॉर्ड करा असेही केंद्राने आपल्या पत्रात म्हटले आहे.

जिल्ह्यात लसीकरणापासून वंचित असलेल्या लोकांची ओळख पटवणे आणि त्यांना प्राधान्याने लस देणे असेही सांगितले आहे. या पूर्वी केंद्राने लसीकरणाच्या बाबतीत राज्यांना सूचना दिल्या होत्या. त्यामध्ये दुसऱ्या डोसवर लक्ष देण्यासह मोठ्या प्रमाणावर लसीकरणासाठी स्थानिक लसीकरण दूतांना सहभागी करून घेण्यास केंद्राने सांगितले होते तसेच जिल्हा आणि गावाच्या लसीकरणासाठी लोकप्रिय असलेल्या आणि ज्यांचे लसीकरण झाले आहे अशा लोकांकडून जनजागृती करून घेण्याचा सल्लाही देण्यात आला होता.

Close Bitnami banner
Bitnami