संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

कोरोना लसीमुळे मृत्यू; बिल गेट्ससहअदार पूनावाला यांना कोर्टाची नोटीस

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई : कोरोना लसीच्या दुष्पपरिणामामुळे मुलगी दगावली असल्याचा आरोप करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली हे. मुंबई हायकोर्टाने या प्रकरणी बिल गेट्स आणि ‘सिरम’चे अदार पूनावाला यांना नोटीस बजावली आहे. त्याशिवाय राज्य सरकारलादेखील नोटीस बजावण्यात आली आहे. डॉ. स्नेहल लुनावत यांच्या मृत्यू प्रकरणी त्यांचे वडील दिलीप लुनावत यांनी ही याचिका दाखल केली होती.
सिरम इन्स्टिट्यूटच्या कोरोना लसीमुळे आपल्या मुलीचा मृत्यू झाला असल्याचे याचिकाकर्ते दिलीप लुनावत यांनी म्हटले आहे. या प्रकरणी नुकसानभरपाई म्हणून सिरमने १००० कोटींची रक्कम द्यावी अशी मागणीही केली आहे. त्याचबरोबर याचिकेत फेसबुक, यूट्यूब, गुगल यांसारख्या सोशल मीडिया आणि मुख्य प्रवाहातील माध्यमांवर कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. या माध्यमांतून लस पूर्णपणे सुरक्षित आहे असा दावा करण्यात आला होता. तसेच त्यामध्ये लसींचे दुष्परिणाम याबाबतची माहिती दडपवण्यात आली होती असा दावा करण्यात आला आहे. न्यायमूर्ती गंगापूरवाला आणि माधव जामदार यांचा समावेश असलेल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने या याचिकेची दखल घेतली आणि याप्रकरणी मुंबई हायकोर्टाने सीरम इन्स्टिट्यूट, मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स, केंद्र आणि राज्य सरकारला नोटीस पाठवली आहे. दरम्यान, बिल गेट्स यांची बाजू मांडणाऱ्या वकिलाने ही नोटीस स्वीकारली आहे.
नाशिकमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या डॉ. स्नेहल लुनावत यांनी कोविशिल्डची लस पूर्णपणे सुरक्षित असून त्याचा काही दुष्परिणाम होत नाही, म्हणून कॉलेजमध्ये कोविशिल्ड लस घेतली होती. लस घेतल्यानंतर तिची प्रकृती ढासळू लागली. अखेर तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. डॉ. स्नेहलने २८ जानेवारी २०२१रोजी कोविशिल्ड लस घेतली होती. त्यानंतर एक मार्च रोजी तिचे निधन झाले असल्याचे दिलीप लुनावत यांनी म्हटले आहे. आपल्या मुलीचा मृत्यू केंद्र सरकार, राज्य सरकार आणि लस उत्पादक कंपनी सिरम इन्स्टिट्यूटच्या चुकीमुळे झाली असल्याचा आरोप करत त्यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami