संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 30 September 2022

कोरोना वाढतोय; जम्मू-काश्मीरच्या ४ जिल्ह्यांमध्ये मास्क बंधनकारक

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

श्रीनगर – कोरोना नियमावलीत शिथिलता आणल्यानंतर आता रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. जम्मू-काश्मीरमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू वाढतोय. त्यामुळे खबदारदारी म्हणून येथील चार जिल्ह्यांमध्ये मास्क घालणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यानुसार आता किश्तवार, गांदरबल, बांदीपोरा आणि रामबन या जिल्ह्यांतील नागरिकांना मास्क घालावा लागणार आहे. तसेच श्रीनगरमध्येही मास्क घालणे बंधनकारक असेल.

रामबनचे जिल्हा दंडाधिकारी मसरत आलम यांनी एका आदेशात म्हटले, ‘जिल्ह्यातील सरकारी कार्यालये, आरोग्य संस्था, बँका आणि वित्तीय संस्थांमध्ये मास्क घालणे बंधनकारक असेल, अन्यथा याठिकाणी प्रवेश दिला जाणार नाही.’ तसेच शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मास्क घातला आहे की नाही याची खात्री करण्यास सांगितले आहे.

दरम्यान, जम्मू आणि काश्मीरमध्ये मंगळवारी ३३३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. मागील दिवसाच्या तुलनेत यात १२० अधिक रुग्णांची भर पडली. तसेच एका रुग्णाच्या मृत्यूसह येथील कोरोनाबळींचा आकडा ४ हजार ७६० वर पोहोचला. दरम्यान, नव्या रुग्णांमध्ये जम्मू विभागातील १८७ आणि काश्मीर खोऱ्यातील १४६ रुग्णांचा समावेश आहे. तसेच याठिकाणी सध्या १ हजार ४०२ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मेअखेरीस हा आकडा ५० च्या खाली गेला होता. त्यामुळे आता प्रशासनाकडून चिंता व्यक्त होत आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami