संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 19 August 2022

कोल्हापुरात कार अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

कोल्हापूर : कोल्हापुरात एका भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ह्या मृतांमध्ये ११ वर्षीय मुलीचा समावेश असून ही घटना शनिवारी २ जुलै रोजी पहाटे घडली. या दुर्घटनेतील मृत चारहीजण एकाच कुटुंबातील होते.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर किणी येथे झालेल्या ह्या अपघातातील मृत चारजण बंगळुरू येथील रहिवासी होते. या दुर्दैवी घटनेत बंद पडलेल्या कंटेनरला एका कारने मागून धडक दिली ह्याच अपघातग्रस्त कारला एका ट्रकनेही धडक दिल्याची भयंकर घटना घडली आहे.

अपघातानंतरचे व्हिडीओ समोर आले असून यात अपघातग्रस्त कारचा चक्काचूर झाल्याचे पाहायला मिळत आहे. कारमधील तिघेजण जागीच ठार झाले आणि एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami