संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 01 July 2022

कोल्हापुरात बॅटरीचा स्फोट; १० नव्याकोऱ्या बाईक जळून खाक

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

कोल्हापूर – नागाळा पार्कच्या अक्षय पार्कमधील प्राईम रोज इमारतीच्या पहिल्या मजल्यावर उभ्या केलेल्या नवीन इलेक्ट्रिक बाईकमधील एका बाईकच्या बॅटरीचा स्फोट झाला. त्यानंतर लागलेल्या आगीत ८ नव्याकोऱ्या बाईक जळून खाक झाल्या. त्यात लाखो रुपयांचे नुकसान झाले. मात्र सुदैवाने कोणीही जखमी झालेले नाही.

कोल्हापूरच्या शाहूपुरीतील तिसर्‍या गल्लीत प्रदीप जाधव यांच्या मालकीचा बॅटरीवरील वाहनांचा शोरूम आहे. तिथे विक्रीसाठी १२ इलेक्ट्रिक बाईक आणल्या होत्या. परंतु शोरूममध्ये जागा नसल्यामुळे ८ बाईक प्राईम रोज या ६ मजली इमारतीच्या तळमजल्यावर उभ्या केल्या होत्या. त्यातील एका बाईकच्या बॅटरीचा स्फोट होऊन आग लागली. त्यानंतर तिने उग्ररूप धारण केल्याने इतर बाईकही आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. स्थानिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात या ८ नव्या बाईक जळून बेचिराख झाल्या. या घटनेमुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या सुरक्षिततेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami