कोल्हापूर : कोल्हापुरात आज ठाकरे गट आक्रमक झाला असून सांगली राज्यमार्गावर रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांकडून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात आली. तसेच 15 दिवसाचे अल्टिमेटम देण्यात आले आहे. या दिवसांत ठोस भूमिका घेतली नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन करु असा इशारा देण्यात आला. दरम्यान आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
कोल्हापूरात आज ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी नुकसान ग्रस्तांना हेक्टरी 50 हजार रुपये तात्काळ मदत द्यावी,अशी मागणी करण्यात आली. ठाकरे गटाचे नेते सुजित मिणचेकर आणि माजी आमदार अरुण दुधवडकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आले.याठिकाणी मोठ्या संख्येने ठाकरे गटाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरला आहे. यावेळी सुजित मिणचेकर म्हणाले की, आदित्य ठाकरे अकोल्यात खोके सरकारला इशारा देण्याकरिता गेले आहेत. तर आतापर्यंत कोल्हापूरात ओला दुष्काळ जाहीर होणे गरजेचे होते.मात्र अद्यापही तसे झाले नाही म्हणून आम्ही हे आंदोलन पुकारले. ज्यांच्या घरांची पडझड झाली आहे त्यांच्यासाठी 25 हजाराची मागणी केली. ती पूर्ण न झाल्यास भविष्यात कोणतीही पूर्वसूचना न देता यापेक्षा मोठे आंदोलन करु. याची सर्व जबाबदारी या खोके सरकारवर राहिल. याशिवाय अब्दुल सत्तार नसून गद्दार आहेत त्यांनी ओला दुष्काळ करण्याची आवश्यकता नाही असे सांगितले.त्यामुळे या कृषीमंत्र्यांचे डोके ठिकाणावर आहे का? असा सवाल मिणचेकरांनी यावेळी केला.तर 15 दिवसांत मागण्या पूर्ण झाल्या नाही तर 15 दिवसानंतर तीव्र आंदोलन करु असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.