संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 02 February 2023

कोल्हापूर बाजार समितीत शेतकऱ्यांनी गुळाचे सौदे बंद पाडले

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

कोल्हापूर : कोल्हापूरच्या शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये गुळाच्या दरात घसरण झाल्यामुळे आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी मंगळवारी गुळाचे सौदे बंद पाडले आहेत. जोपर्यंत गुळाला योग्य दर मिळत नाही तोपर्यंत सौदे सुरु होऊ देणार नाही अशी आक्रमक भूमिका घेत शेतकऱ्यांनी गुळाचे सौदे बंद पाडले. तसेच, कर्नाटकी गुळामुळे दर घसरल्याचे आरोप करत हा गूळ बंद करा अशी मागणीही यावेळी शेकऱ्यांकनी लावून धरली.

मिळालेल्या माहितीनुसार, गुळाला प्रतिक्विंटल ३७०० पेक्षा अधिकचा दर मिळावा ही शेतकऱ्यांची मागणी आहे. कोल्हापुरात यंदा गुऱ्हाळघरे सुरु होऊन दीड महिना उलटला असतानाही गुळाला योग्य दर मिळत नाही. त्यामुळे शेतकरी संतापले होते. मंगळवारी बॉक्समधील गूळ रव्याचा सौदा सुरु असतानाच शेतकऱ्यांना अपेक्षित दर न मिळाल्याने सौदे बंद पाडले आणि जोपर्यंत योग्य दर मिळत नाही तोपर्यंत सौदे सुरू करू देणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. त्यांनतर बाजार समितीचे प्रशासक प्रकाश जगताप यांच्या अध्यक्षेतेखाली झालेल्या बैठकीत शेतकरी अधिक आक्रमक झाले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी गुळ उत्पादक शेतकऱ्यांकडून कर्नाटकात तयार झालेला गुळ हा कोल्हापूरचा गुळ म्हणून मोठ्या प्रमाणावर विक्रीला येत असल्याचे समोर आणले. त्यामुळे कर्नाटकी गुळ बंद करा, अन्यथा आम्हीच बाजार समितीत गुळ विक्रीला आणत नसल्याचा पवित्रा शेतकऱ्यांकडून घेण्यात आला. कोल्हापूरच्या नावाखाली कर्नाटकातून आलेल्या गुळाची विक्री ही बाब गंभीर असून यावर कायदेशीरित्या कारवाई करण्याची मागणी गुळ उत्पादक शेतकऱ्यांनी प्रशासकांकडे केली. त्यामुळे आक्रमक झालेल्या शेकऱ्यांना प्रशासकांनी आपण आपल्या सर्वाधिकरांचा वापर करून या ठिकाणी कारवाई करू असा आश्वासन दिले.

मात्र मंगळवारी गुळाचे सौदे होऊच शकले नसल्याने बाजार समितीत गुळाचे ९०१८ बॉक्स व २२ हजार गूळ रवे पडून आहेत. बुधवारी अमावस्या असल्यामुळे मूळ मार्केट बंद असणार आहे. त्यामुळे आता गुळाचे सौदे हे गुरुवारी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami